शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

साखर उत्पादन १ कोटी क्विंटलकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:22 IST

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी दि. १० एप्रिलअखेर ७९ लाख टन उसाचे गाळप करुन ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, मागील दहा वर्षातील हे विक्रमी गाळप आहे. दहा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केले असून पाच कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या आठ दिवसात बंद होणार ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी दि. १० एप्रिलअखेर ७९ लाख टन उसाचे गाळप करुन ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, मागील दहा वर्षातील हे विक्रमी गाळप आहे. दहा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केले असून पाच कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या आठ दिवसात बंद होणार आहेत. यावर्षी प्रथमच जिल्ह्यातील कारखाने एक कोटी क्विंटल साखरेचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात एकूण १८ साखर कारखाने असले तरी, यशवंत, डफळे आणि तासगाव या कारखान्यांचे गळीत हंगाम दोन वर्षापासून बंदच आहेत. उर्वरित १५ साखर कारखान्यांनी नोव्हेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यात गळीत हंगामाला सुरुवात केली. चार महिने अखंडित गळीत हंगाम घेऊन ७९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. वसंतदादा (सांगली), राजारामबापू पाटील (साखराळे, ता. वाळवा), विश्वास (चिखली, ता. शिराळा), महांकाली (कवठेमहांकाळ), राजारामबापू (वाटेगाव, ता. वाळवा), राजारामबापू (सर्वोदय युनिट, कारंदवाडी, ता. वाळवा), मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), निनाईदेवी (दालमिया, कोकरुड, ता. शिराळा), उदगिरी शुगर अँड पॉवर (बामणी-पारे, ता. खानापूर), सद्गुरु श्री श्री शुगर (राजेवाडी, ता. आटपाडी) या दहा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. सध्या हुतात्मा (वाळवा), माणगंगा (आटपाडी), क्रांती (कुंडल, ता. पलूस), सोनहिरा (वांगी, ता. कडेगाव) आणि केन अ‍ॅग्रो (डोंगराई, ता. कडेगाव) या पाच कारखान्यांचे गळीत हंगाम आठवडाभर चालू राहणार आहेत. या कारखान्यांमध्ये जवळपास तीन ते चार लाख टन उसाचे गाळप होऊन पाच ते सहा लाख क्विंटल साखरेचे उत्पादन होणार आहे. म्हणजेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा एक कोटी क्विंटल साखरेचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. यावर्षी दहा वर्षातील विक्रमी गाळप होणार असल्याचेही कारखानदारांचे मत आहे.राजारामबापू साखराळे युनिटने जिल्ह्यातील सर्वाधिक गाळप करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सर्वात कमी गाळप माणगंगा साखर कारखान्याचे असून तेथे आतापर्यंत केवळ ८३ हजार २२४ टन उसाचे गाळप करुन ६९ हजार ९२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये : महावीर पाटीलजिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी मार्चचा पूर्ण महिना आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या उसाची बिले शेतकºयांना दिलेली नाहीत. तसेच सर्वच साखर कारखानदारांनी साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करून एफआरपीनुसार बिलेच दिली नाहीत. साखर कारखानदारांनी सरकारकडे भांडावे आणि अनुदान घ्यावे, काहीही करावे, पण शेतकºयांना शंभर टक्के बिले द्यावीत, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोल छेडावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी दिला आहे.जिल्ह्यातील गळीत हंगामाची सद्यस्थिती...कारखाना ऊस गाळप (मे. टन) साखर उत्पादन (क्विं.) उतारा टक्केवसंतदादा ७१३६७० ८५१६७० ११.९३राजारामबापू (साखराळे) १००८१८० १२८७००० १२.७७विश्वासराव नाईक ५३३९५५ ६४४००० १२.०६हुतात्मा ६८३४४० ८७७५०० १२.८४माणगंगा ८३२२४.७ ६९९२५ ८.४०महांकाली १८२४८० १९४७७० १०.६७राजारामबापू (वाटेगाव) ५३२५३०९ ६७०७०० १२.५९सोनहिरा ९१५२४५ ११३९२५० १२.४५क्रांती ९०४३१० १११३९५० १२.३२सर्वोदय ४१९१३९.९ ५२८००० १२.६०मोहनराव शिंदे ३७०२८५ ४२२६१० ११.४१निनाईदेवी (दालमिया) १४७४९१ १८२३५० १२.३६केन अ‍ॅग्रो ३७४१४० ४५६१६० १२.१९उदगिरी शुगर ४६१०२० ५४३४०० ११.७९सद्गुरु श्री श्री शुगर ५०३२३७.५ ५८३४०० ११.५६एकूण ७८३२३४९ ९६१२०८५ १२.२१